धमाकेदार खेळ दाखवत टीम इंडियाने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना SCO संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 17.4 षटकांच्या खेळात 85 धावांवर सर्वबाद झाला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 3-3 विकेट्स घेतल्या. भारताने 86 धावांचे लक्ष्य 6.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. सामन्याचा थेट स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना स्कॉटलंडची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने काइल कोएत्झरला (1) क्लीन बोल्ड करून टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. जॉर्ज मुन्सेला (24) बाद करून शमीने दुसरा धक्का दिला. 7 व्या षटकात रवींद्र जडेजाने तिसऱ्या चेंडूवर रिची बेरिंग्टन (0) आणि सहाव्या चेंडूवर मॅथ्यू क्रॉस (2) यांना बाद करून स्कॉटलंडचे कंबरडे मोडले. जडेजा एवढ्यावरच थांबला नाही आणि त्याने मायकेल लिस्कला (21) बाद करून भारताला 5 वे यश मिळवून दिले. आर अश्विनच्या खात्यात ख्रिस ग्रीव्हजची (1) विकेट आली.
शमीने 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅलम मॅक्लिओडला (16) क्लीन बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर शुफयान शरीफ (0) धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर शमीने अलास्डेअर इव्हान्सला शून्यावर क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे टीम इंडियाने लागोपाठ तीन चेंडूत 3 विकेट घेत विकेट्सची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
- SCO डावाच्या तिसऱ्या षटकात बुमराहने एकही धाव न देता 1 बळी घेतला.
- मुन्सेने आर अश्विनविरुद्ध डावातील चौथ्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन चौकार मारले.
- पॉवरप्लेपर्यंत स्कॉटलंडची धावसंख्या 2 गडी गमावून 27 धावा होती.
- रिची बेरिंग्टन 9 व्यांदा T20I मध्ये शून्यावर बाद झाला.
- भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली, तर स्कॉटलंडने त्यांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
- अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या यशाच्या शोधात आहे.
दोन्ही संघ-
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
स्कॉटलंड – जॉर्ज मुन्से, काइल कोएत्झर (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅक्लिओड, मायकेल लिस्क, ख्रिस ग्रीव्हस, मार्क वॉट्स, शुफायन शरीफ, अलास्डेअर इव्हान्स, ब्रॅडली व्हीलर
#Bollywood । दिवाळीच्या दिवशी रिलीज होणाऱ्या कित्येक चित्रपटांनी मोडले बॉक्स ऑफिस रिकॉर्ड