Home Legal @AnilDeshmukhNCP । माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीचा अखेरचा दिवस, जामीन मिळणार...

@AnilDeshmukhNCP । माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीचा अखेरचा दिवस, जामीन मिळणार का?

622

मुंबई ब्युरो : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. ईडीनं 12 तास चौकशी करुन त्यांना अटक केली होती. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात चांदीवाल आयोगासमोर कोणतेही पुरावे द्यायचे नसल्याचं म्हटलंय. दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (5 नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, ते हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल.

ऋषिकेश देशमुख यांना ईडीचं समन्स

अनिल देशमुख यांना मुंबईतील ईडी कार्यालयात ऋपिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. मात्र, ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नसून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीय.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

परमबीर सिंग यांचा यूटर्न?

महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे सादर करणार नसल्याचं म्हटलंय.

#MukeshAmbani | लंदन में अंबानी ने 592 करोड़ रुपए में खरीदी जमीन, 300 एकड़ के घर में 49 बेडरूम