Home Maharashtra @nawabmalikncp । मलिक म्हणाले- आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू; उद्या सकाळी पर्दाफाश...

@nawabmalikncp । मलिक म्हणाले- आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू; उद्या सकाळी पर्दाफाश करणार

717

मुंबई ब्युरो : देवेंद्र फडणवीसांचे फटाके भिजलेले आहे. त्यांना माहिती पुरविणारा खेळाडू कच्चा आहे. माझ्यावर असे गंभीर आरोप कधीच झाले नाही. मात्र फडणवीसांनी अंडरवर्ल्डचा खेळ सुरूच केला आहे तर तो आम्ही पूर्ण करू. तसेच उद्या सकाळी दहा वाजता फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले नाते उघड करणार तसेच उद्या सकाळी दहा वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार-

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या मदतीने राज्य वेठीला धरले होते. फडणवीसांचे अंडरवल्डशी संबध असल्याचा खुलासा उद्या करणार असून उद्या मुंबईत अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, फक्त 10 वाजेपर्यंत थांबा असे नवाब मलिक म्हणाले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले. नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यांनी कवडीमोल भावात अंडरवर्ल्डच्या लोकांकडून मुंबईत 3 एकर जमीन घेतली. त्याचे पुरावे आपण योग्य त्या तपास संस्थेकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी मलिकांचे प्रकरण बाहेर काढले, आंबेडकरांचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ”स्वतःचे प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचे प्रकरण काढलं” असं आंबेडकर म्हणाले. फडणवीसांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनच आता आंबेडकर यांनी फडणवीसांवर निशाना साधला आहे.

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही. स्वतःचे प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचे प्रकरण काढले. आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणं निकाली काढावे, असंही आंबेडकर म्हणाले.

@Dev_Fadnavis । अंडरवर्ल्डशी नवाब मलिक कुटुंबियांचे संबंध, मुंबईतील 3 एकर जागा कवडीमोल भावात घेतली