Home Covid-19 #Maharashtra । राज्याने पूर्ण केला 10 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा : आरोग्यमंत्री...

#Maharashtra । राज्याने पूर्ण केला 10 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

561

महाराष्ट्राने मंगळवारी दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो, अशा भावनाही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

राज्यात अजूनही 13 हजार 311 सक्रिय रुग्ण

दरम्यान, मंगळवारला दिवसभरात राज्यात 982 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 1 हजार 293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 19 हजार 329 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 40 हजार 430 जणांचा मृत्यू झाला असून 64 लाख 61 हजार 956 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 13 हजार 311 सक्रीय रुग्ण आहेत.

@msrtcofficial । एसटी महामंडळाची मोठी कारवाई: राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचारी निलंबित!