देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
2014 ते 2019 या काळात पायाभूत सुविधांकरता करता 6500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, पुन्हा 2020 मध्ये विवीध ठिकाणच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा 2300 कोटींची कामे करावी लागत आहेत, याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जा विभागाने दिला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महावितरणाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून दोन वर्षांत 3 हजार 387 कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव ऊर्जा विभागास सादर झाले. तथापि, मागील 12 वर्षात 19 हजार कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत? याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला होता.
यावर भाजपचे काय म्हणणे?
भाजप आमदार आशिष शेलार यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, नक्की चौकशी करा. पण यातून काही निष्पन्न होणार नाही. हा सुद्धा एक असा आरोप आहे जो अंगाला चिटकणार सुद्धा नाही. जुन्या कंत्राटदारांकडून पैसे काढण्यासाठी तर नितीन राऊत ही चौकशी लावली नाही ना असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
@msrtcofficial । संपकरी एसटी बस कर्मचाऱ्यांवर पुन्हा मोठी कारवाई: पुन्हा 542 कर्मचाऱ्यांचे निलंबन