Home Maharashtra नवाब मलिकांचा मोठा खुलासा, के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे...

नवाब मलिकांचा मोठा खुलासा, के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट केले पोस्ट

575
मुंबई ब्युरो : मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. एनसीबीने केलेली अटक ही बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर देखील मलिकांनी गेल्या काही दिवसांपासून टीकेचे सत्र सुरू केले आहे.

आज मलिक यांनी एक ट्विट करत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मलिकांनी सोशल मीडियावर एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. ती चॅट के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांची असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यावर संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

नवाब मलिक यांनी ट्विट करत, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याद्वारे त्यांनी समीर वानखेडे आणि के.पी. खान यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिक म्हणाले की, हे के.पी. गोसावी आणि काशिफ खान यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संभाषण आहे. काशिफ खानला प्रश्न का विचारले जात नाहीत.

काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅप संभाषणाचा स्क्रीनशॉटही त्यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान, मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहेत. वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचाही आरोप केला आहे.