Home Covid-19 #Covid । वाढत्या प्रादुर्भावामुळे जम्मूमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

#Covid । वाढत्या प्रादुर्भावामुळे जम्मूमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

512

जम्मू-काश्मीरच्या जम्मू प्रांतामध्ये आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जम्मू परिसरात कोविड-19 संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

दरम्यान रात्रीच्या कर्फ्यू संदर्भातील निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिकारी अंशुल गर्ग यांनी मंगळवारी सांगितले. गर्ग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जम्मूमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने, डीडीएमए (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) ने 17 नोव्हेंबर (बुधवार) पासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.”

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचा आकडा 3 लाखांवर

जम्मू-काश्मीरच्या कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असता हा आकडा 3 लाख 34 हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी, कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजार 453 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबरपासून जम्मूमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.