Home Bollywood मन्नतच नव्हे, दुबईमध्ये खासगी बेटासह अलिबागमधील आलिशान बंगल्याचा मालक आहे शाहरुख खान

मन्नतच नव्हे, दुबईमध्ये खासगी बेटासह अलिबागमधील आलिशान बंगल्याचा मालक आहे शाहरुख खान

564

किंग खानचे आयुष्य हे इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत आहे. शाहरुख खानचे घर ‘मन्नत’ हे मुंबईतील सर्वात चर्चेत आणि प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे, तर सुपरस्टारकडे याशिवाय देखील इतर लॅव्हिश प्रॉपर्टीजदेखील आहेत. यामध्ये दुबईतील एक खाजगी बेट आणि अलिबागमधील एक लॅव्हिश हॉलिडे होम यांचा समावेश आहे. SRK चा सी-फेसिंग अलिबाग बंगला 19,960 स्क्वेअर मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. या आलिशान बंगल्यात हेलिपॅडही आहे. या घराचे इंटीरियर त्याची पत्नी गौरी खानने केले आहे.

इंडस्ट्रीतील अनेक मित्र बंगल्यावर येतात

शाहरुख खान अनेकदा कौटुंबिक प्रसंग आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्याच्या अलिबाग येथील घरी जातो. करण जोहर, कतरिना कैफ, आलिया भट्ट, फराह खान, सिद्धार्थ मल्होत्रा, श्वेता बच्चन नंदा, अनन्या पांडे आणि दीपिका पदुकोण या इंडस्ट्रीतील त्याचे अनेक मित्र शाहरुखच्या बंगल्यावर स्पॉट झाले आहेत.

अलिबागमध्ये वाढदिवस साजरा केला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने यावर्षी त्याचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा केलाय. शाहरुखच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच त्याचा मुलगा आर्यनला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजुर झाला होता. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका लक्झरी क्रूझवर छापा टाकल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (NCB) आर्यनला अटक केली होती.

शाहरुख खानचे वर्क फ्रंट

वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे शाहरुख सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’मध्ये दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, तो एटलीच्या एका चित्रपटात झळकणार असून यात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार हिरानीच्या इमिग्रेशन ड्रामाचा देखील SRK एक भाग आहे. शाहरूखने अद्याप या सर्व प्रोजोक्ट्सची अधिकृत पुष्टी केलेली नाही.