Home Forest #Maharashtra । वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला 15...

#Maharashtra । वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत

663
ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. वाघाच्या या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.

मृत स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे आणि त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 येथे पोहोचल्या त्यावेळी वाघाने हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत 4 वनमजूर सुद्धा होते. त्यांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्वाती यांचा मृतदेह घनदाट जंगलात आढळला.