कर्नाटकातील धारवाडमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या 66 वरून 182 वर पोहोचली आहे. अलीकडेच कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित बहुतेकांना कोरोनाविरूद्ध लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते.
पार्टीनंतर कोरोना पसरण्याच्या भीतीने महाविद्यालयातील 300 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांची चाचणी घेण्यात आली होती. गुरुवारी रिपोर्टमध्ये ६६ विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले होते. आज आणखी लोकांची चाचणी घेतली जाईल.
अधिका-यांनी सांगितले की, बाधितांना महाविद्यालयाच्या आवारात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि खबरदारी म्हणून दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत. राज्य आरोग्य विभाग आज कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 3,000 हून अधिक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या चाचण्या (क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल) घेणार आहे.