सोशल मीडियातील दिग्गज कंपनी ट्विटरचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी यांनी पदत्याग करण्याची घोषणा केली आहे. जॅक डोर्सी यांनी २००६ मध्ये बिज स्टोन आणि इवान विल्यम्ससह ट्विटरची सुरुवात केली होती. डोर्सीची जागा पराग अग्रवाल घेतील. अॉटॉमेटिक एनर्जी सेंट्रल स्कूल आणि नंतर आयआयटी मुंबईत शिकलेले अग्रवाल २०११ पासून कंपनीत आहेत आणि २०१७ पासून चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर(सीटीओ) आहेत. डोर्सी यांच्या पद सोडण्याच्या घोषणेनंतर नॅसडॅकमध्ये कंपनीचे शेअर ११% वधारले. यानंतर ट्रेडिंग रोखावी लागली. डोर्सींचा राजीनामा तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. मात्र, ते शेअरधारकांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या बैठकीपर्यंत संचालक मंडळात राहतील.
डोर्सी यांचे पत्र :
पराग प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामागे राहिले आहेत, त्यांनी ट्विटरचा कायापालट करण्यात मदत केली : डोर्सी
हॅलो टीम,
आपल्या कंपनीत जवळपास १६ वर्षांपर्यंत राहिल्यानंतर… सहसंस्थापकापासून सीईओ, नंतर चेअरमन, एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि नंतर अंतरिम सीईओ ते सीईओपर्यंत… यानंतर माझ्या जाण्याची वेळ आली आहे, हे मी निश्चित केले. का? संस्थापकाचे नेतृत्व असणाऱ्या कंपनीच्या महत्त्वाबाबत खूप सारे बोलेले जाते. अखेर मला असे वाटते की, हे गंभीर रूपातील मर्यादित आणि अपयशाचा एक बिंदू आहे. ही कंपनी आपल्या संस्थापकांपेक्षा वेगळी व्हावी हे निश्चित करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. आत्ताच विभक्त होण्याची वेळ आली आहे, असे वाटण्याची तीन कारणे आहेत. पहिले, पराग आपले सीईओ होत आहेत. बोर्डाने सर्व पर्यायांचा विचार करत कठोर प्रक्रिया अंगीकारली आणि सर्वसंमतीने परागना नियुक्त केले. ते काही काळासाठी माझ्या आवडीचे राहिले आहेत. त्यांना कंपनी आणि तिच्या गरजांची खोलवर समज आहे.
कंपनीचा कायापालट करण्यात मदत ठरणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामागे पराग राहिले आहेत. ते जिज्ञासू, चौकस, तर्कसंगत, रचनात्मक, मागणी करणारे, आत्मजागरूक आणि नम्र आहेत. ते पुढे जाताना हृदय आणि आत्म्याची साद ऐकतात. ज्यांच्याकडून रोज शिकतो, असे ते व्यक्ती आहेत. आमच्या सीईओच्या रूपात त्यांच्यावर माझा गाढ विश्वास आहे. दुसरे, ब्रेट टेलर आमचे बोर्ड अध्यक्ष होण्यासाठी सहमत आहेत. तिसरे, तुम्ही सर्व. या टीममध्ये आपली खूप महत्त्वाकांक्षा आणि क्षमता आहे.
यावर विचार करा
पराग यांनी येथे एक अभियंत्याच्या रूपात सुरुवात केली. ते आपल्या कामाप्रति खूप काळजी करत होते आणि आता ते आपले सीईओ आहेत.(माझ्याकडेही असाच मार्ग होता… त्यांनी तो सुखकर केला) ही एवढीच गोष्ट मला गौरवान्वित करते. पराग ही ऊर्जा सर्वात चांगल्या पद्धतीने पसरवण्यात सक्षम होतील, असा विश्वास आहे. कारण, ते हे जगले आहेत आणि यात कशाची गरज आहे हे त्यांना माहीत आहे. तुम्हा सर्वात या कंपनीला बदलण्याची क्षमता आहे. धन्यवाद. जॅक…
जगात भारतीयांचे वर्चस्व
- – सुंदर पिचाई, गुगल व अल्फाबेट
- – सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्ट
- – शंतनू नारायण, अॅडोब
- – अरविंद कृष्णा, आयबीएम.