मुंबई ब्युरो : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढल्याची पाहायला मिळत आहे. असे असताना देशाच्या आर्थिक राजधानीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी राज्य सरकार सावधगिरी बाळगताना दिसत आहे. परदेशी प्रवाशांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर कोरोना चाचणी केली जात आहे.
दरम्यान, विमानतळावर कशाप्रकारे प्रवाशांची तपासणी सुरू आहे, याचा आढावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला. सोमवारी रात्री मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर यांनी अचानक मुंबई विमानतळाला भेट दिली. यावळी मुंबई विमानतळावरील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘बीएमसी कर्मचारी आणि एअरपोर्ट अथॉरिटी नियमांचे व्यवस्थित पालन करत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांमुळे समाधानी आहे. मुंबईकरांनी घाबरू नये. दक्षिण आफ्रिकामधून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या तपासणीसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे.
#रात्री_१.०० वा
कोविड-१९ च्या नवीन #ओमायक्राँन या उत परिवर्तित विषाणूच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने @OfficeofUT ji व @AUThackeray ji यांच्या निर्देशानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कश्या पद्धतीने तपासणी करण्यात येते याची पाहणी pic.twitter.com/BA3h5c74cE— Kishori Pednekar (@KishoriPednekar) November 29, 2021
मुंबईत अद्याप एकही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण सापडलेला नाही, हे दिलासादायक आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वोत्परीने प्रयत्न केले जात आहेत. ज्याप्रमाणे तिसऱ्या लाटेला हरवले, तसेच या नव्या विषाणूलाही हरवूयात.’ असे पेडणेकर म्हणाल्या.
विमानतळावर प्रवाशांची तपासणी योग्य रित्या सुरू आहे की, नाही यासाठी महापौर किशोरी पेडणेकर सोमवारी रात्री विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत उप महापौर अँड. सुहास वाडकर देखील उपस्थित होते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे. कोणती खबरदारी घेतली जात आहे. याची पाहणी पेडणेकर यांनी केली.
दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी एक हजारांच्या आसपास प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आल्याची माहिती दिली होती. या सर्वांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.