Home Bollywood #Bollywood । ‘कभी ईद कभी दिवाली’साठी 150 ऐवजी 125 कोटी घेणार सलमान,...

#Bollywood । ‘कभी ईद कभी दिवाली’साठी 150 ऐवजी 125 कोटी घेणार सलमान, साजिद ने केली विनंती

583

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अतिम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान आता लवकरच त्याचा आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’चे शूटिंग सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. साजिदच्या ‘कभी ईद कभी दिवाली’साठी सलमानने त्याची फी कमी केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटासाठी तो आता 125 कोटी फी घेत आहे.

सलमान खान जानेवारीपासून ‘कभी ईद कभी दिवाली’चे शूटिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, जेव्हा सुपरस्टार सलमान चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्याकडे चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलच्या तारखांवर चर्चा करण्यासाठी पोहोचला, तेव्हा निर्मात्यांनी सलमानला त्याच्या मानधनावर विचार करण्याची खास विनंती केली. कारण कोरोनाच्या काळात मार्केटची अवस्था वाईट झाली आहे.

सलमान खानने क्षणाचाही विलंब न लावता साजिद नाडियाडवालाची ही विनंती मान्य केली आणि आपली फी कमी करण्याचे मान्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानने ‘कभी ईद कभी दिवाली’साठी 125 कोटी रुपये मानधनात काम करण्यास होकार दिला आहे. त्यानुसार त्याने त्याचा निर्माता मित्र साजिद नाडियादवाला यांना त्याच्या मानधनात सुमारे 15 टक्के सूट दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट रिलीज झाल्यानंतर सलमानलाही नफ्यातील काही वाटा मिळणार आहे. सलमान खानचे बॅनर ‘सलमान खान फिल्म्स’ (एसकेएफ)चाही या चित्रपटात सहभाग असण्याचे हेही एक कारण आहे. सलमानने कोरोनापूर्वी ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट साइन केला होता. त्यावेळी सलमानने साजिदसोबत 150 कोटी रुपयांची डील केली होती. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही.