Home Environment #Maharashtra | राज्याला ‘जोवाड’ चक्रिवादळाचा धोका; आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

#Maharashtra | राज्याला ‘जोवाड’ चक्रिवादळाचा धोका; आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

509
एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे तर दुसरीकडे मात्र हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत बुधवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज सकाळपासून अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे.

ऐन हिवाळ्यात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यात देखील पाऊस पडत आहे.

अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून, अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आले आहे. तर मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

पुढील तीन तासात या भागात पावसाची शक्यता

30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.

महाराष्ट्राच्या अनेक भागात बुधवारपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याती विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानेल हजेरी लावली आहे. आज पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज असून, आज पहाटेपासून मुंबईत रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट देण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळमुळे पाऊस पडत आहे.

कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारपासून अवकाळी पाऊस पडत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पुढील तीन तासात मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे नाशिकमध्ये पावसाची शक्यता

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. ए. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये रायगड, ठाणे, मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण

बुधवारपासून औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काल मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे.