Home Exam MPSC Exam । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 200 पदांची भरती, 4 डिसेंबरपासून राज्यसेवा...

MPSC Exam । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 200 पदांची भरती, 4 डिसेंबरपासून राज्यसेवा परीक्षा

547

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक राज्य कर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त, प्रकल्प अधिकारी यासह विविध संवर्गातील व सेवांमधील एकूण २०० पदांच्या भरतीसाठी राज्य सेवेची मुख्य परीक्षा २०२० येत्या ४ ते ६ डिसेंबर २०२१ रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील नाशिकसह अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे या जिल्हा केंद्रांवर राज्य सेवेची मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य लाेकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षा २०२० ची जाहिरात डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आयोगातर्फे राज्य सेवेची पूर्व परीक्षा २०२० ही २१ मार्च २०२१ ला घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०२१ ला जाहीर करण्यात आल्यानंतर या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ही ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेतली जाणार आहे. उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी आधारकार्ड किंवा इतर मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत आणणे अनिवार्य आहे.

या पदांसाठी होणार मुख्य परीक्षा

सहायक कर आयुक्त, गट-अ (१० पदे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, (७ पदे), सहायक आयुक्त, प्रकल्प अधिकारी, श्रेणी-२, (१ पद), उद्योग उपसंचालक, तांत्रिक, (१ पद), उपशिक्षणाधिकारी, शिक्षणसेवा, (२५ पदे), कक्ष अधिकारी (२५ पदे), सहायक निबंधक सहकारी संस्था (१९ पदे), सहायक गटविकास अधिकारी (१२ पदे), नायब तहसीलदार (७३ पदे) यासह इतर संवर्गच्या २०० पदांची भरती केली जाईल.