Home Maharashtra #Nagpur | गोंडवाना गॅलरी येथील हातमाग प्रदर्शनीचे उद्घाटन

#Nagpur | गोंडवाना गॅलरी येथील हातमाग प्रदर्शनीचे उद्घाटन

800

नागपुर ब्युरो : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या., नागपूर द्वारे उत्पादीत उच्च दर्जाच्या उत्पादनाचे विशेष प्रदर्शन व विक्री गोंडवाना गॅलरी, हॉटेल सेंट्रल पॉर्इंटचे मागे, रामदासपेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर शीतल तेली-उगले यांचे हस्ते 7 डिसेंबर रोजी करण्यात आले.

सदर प्रदर्शनीत हातमागावर उत्पादीत अस्सल वस्त्रे जसे सिल्क, टस्सर करवती साडी व पैठणी साडी (जीआई प्रमाणित), सिल्क टस्सर ड्रेस मटेरिअल, लेडीज-जेंट्स व किड्स गारमेंट्स, बांबू बनाना ब्लंडेड फॅब्रिक्स व साड्या, कॉटन साडी, स्कार्फ, स्टोल, दूपट्टे, टाय, दैनंदिन वापरावयाच्या चादरी, टॉवेल, बेडशिट, दरी आणि बरेच काही उपलब्ध करण्यात आले आहे.

या प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये असे की, हातमाग विणकरांनी परंपरागत पद्धतीने हातमागावर विणकाम केलेले अस्सल हातमाग वस्त्रे प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनी दरम्यान विक्रीच्या माध्यमातून रोजगारात भर पडण्यास मदत होते शिवाय प्रचार प्रसिद्धी होऊन मागणी वाढते. सर्वांना हातमाग प्रदर्शनीला भेट देऊन वस्त्रे खरेदी करुन शासनाचे उद्देश पुर्तीस हातभार लावण्याचे व विणकरांना प्रोत्साहीत करण्याचे आव्हान उद्घाटन प्रसंगी शीतल तेली-उगले यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी हातमाग महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय निमजे, वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे सह आयुक्त श्रीमती पाटील, श्री. पक्वाने, सह आयुक्त रणापिसे, प्रादेशिक उपआयुक्त श्रीमती पांडे, सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत वावगे, मातमाग महामंडळाच्या डिझायनर श्रीमती निधि गांधी, श्री. करंदीकर तथा आयुक्तालयातील व महामंडळातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.