Home Woman #Gadchiroli । राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या माध्यमातून महिलांना सक्षम करणार -सौ.रुपालीताई चाकणकर

#Gadchiroli । राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या माध्यमातून महिलांना सक्षम करणार -सौ.रुपालीताई चाकणकर

670

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची गडचिरोलीत आढावा बैठक

गडचिरोली ब्युरो : सावित्रीची लेक सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. अनेक अत्याचार सहन करत आहे. मात्र राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून सक्षम आणि बळकट करणार असल्याचे भावोद्गार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राज्य अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांनी केले. गडचिरोली येथील पटेल मंगल कार्यालयात आयोजित शहर व ग्रामीण आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

चाकणकर पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महिला आयोगाची स्थापना केली आणि त्यातून अनेक महिलांना न्याय मिळत आहे. आता ही जबाबदारी माझ्याएकटी कडे नसून प्रत्येक महिला कार्यकर्त्यांची, पदाधिकारी यांची असून महिला काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष आणि महिला आयोग महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. कोरोना काळ, नोटबंदी, वाढती महागाई मुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होऊन महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अनेक बालविवाह झाले मात्र आता महिलांवर होणारे अत्याचार सहन करून घेणार नसून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे.

त्या म्हणाल्या, आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले असून जास्तीत जास्त महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निवडणूकीच्या रणात उतरले पाहिजे. गडचिरोलीचा हा माझा चौथा दौरा असून यापुढे जिल्ह्याशी असलेली नाळ तुटू देणार नाही. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या मुंबईत येऊ शकत नाही म्हणून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला असून याची सुरुवात गडचिरोली व चंद्रपूर पासून सुरू केली आहे असेही त्या म्हणाल्या. महिलांवर अत्याचार झाल्यास टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी. बारा मिनिटाच्या आत पोलीस तिथे पोहोचतील, निर्भया सेल, दामिनी सेल हे आपल्याला मदत करतील असे त्या म्हणाल्या.

मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष शाहीनभाभी हकीम, बबलूभैय्या हकीम, वर्षाताई निकम विभागीय निरीक्षक, श्रीकांतजी शिवणकर निरीक्षक, जिल्हा निरीक्षक वंदना आवळे, सोनालीताई पुण्यपवार विभागीय सचिव, युवक काँग्रेस अध्यक्ष लीलाधर भरडकर आदी उपस्थित होते.

रुपालीताईचे आगमन गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी रेला नृत्याने व आतिषबाजी ने करण्यात आले.यावेळी रुपालीताई यांनी स्वतः महिलांससोबत रेला नृत्य करून सर्व महिलांध्ये ऊर्जा भरली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्ष शाहीन हकीम यांनी केले.त्या म्हणाल्या की रुपालीताई सारख्या व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावर आहे मात्र त्यांचा साधेपणा आणि अत्याचार विरुद्ध लढण्याची शक्ती हीच आमची संपत्ती आहे.महिला आयोगाच्या अध्यक्ष बनून अवघ्या एका महिन्यातच त्यांनी गडचिरोली व चंद्रपूर चा दौरा केला आहे.रुपालीताई आमचा गर्व असून आमची शक्ती आहे असे त्या म्हणाल्या.

वर्षाताई निकम यांनी आपल्या शब्दातून रुपालीताई चे कौतुक केले.भाग्यश्रीताई आत्राम यांनी ही रुपाली ताई यांचे अनेक कार्याबद्दल माहिती देत योग्य पदावर योग्य व्यक्ती अल्सयाचे बोलले.रविभाऊ वासेकर म्हणाले की रुपालीताई या गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना योग्य न्याय मिळवून देतील असा आमचा विश्वास असल्याचे बोलले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका,सामाजिक कार्यकर्त्या,महिला वकील यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली तर्फे रुपालीताई यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी महिला काँग्रेस अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांनीं केले.यावेळी शेकडो महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या.