गडचिरोली ब्युरो : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष गडचिरोली च्या वतीने शुक्रवारी गडचिरोली येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राज्य अध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्या सौ. लीना समशेरखान पठाण यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्राचार्य पठाण यांचे अभिनंदन केले जात आहे.
या प्रसंगी मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष शाहीनभाभी हकीम, बबलूभैय्या हकीम, वर्षाताई निकम विभागीय निरीक्षक, श्रीकांतजी शिवणकर निरीक्षक, जिल्हा निरीक्षक वंदना आवळे, सोनालीताई पुण्यपवार विभागीय सचिव, युवक काँग्रेस अध्यक्ष लीलाधर भरडकर सह राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रात्री उशिरा पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक: हॅकर्सने बिटकॉइन कायदेशीर करण्यासाठी ट्विट केले