Home Maharashtra ‘महंगाई हटाव रॅली’त हजारोंच्या संख्येने सहभागी होणार, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची बैठक...

‘महंगाई हटाव रॅली’त हजारोंच्या संख्येने सहभागी होणार, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची बैठक संपन्न

531
मुंबई ब्युरो : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जयपूर येथे 12 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘महंगाई हटाव रॅली’मध्ये महाराष्ट्रातून अल्पसंख्याक विभागाचे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा पार पडली. या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रभारी मोहमद अहमद, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरिफ मोहमद नसीम खान, प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख, उपाध्यक्ष शेख ईब्राहिम भाईजान, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष अहमद हुसेन चाऊस, कोकण विभागीय अध्यक्ष अनिस कुरेशी, अमरावती विभागीय अध्यक्ष अब्दुल जब्बार, नागपूर विभागीय अध्यक्ष ओवेस कादरी, पुणे विभागीय अध्यक्ष नदीम मुजावर, सर्व जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जयपूर येथे होणाऱ्या ‘महंगाई हटाव रॅली’साठी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने 28 डिसेंबरला मुंबईत खा. राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यात आली. 28 डिसेंबरच्या कार्यक्रमातही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

मंत्री अस्लम शेख यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या व संबंधित विभागाकडे त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रभारी मोहमद अहमद व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.


रात्री उशिरा पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक: हॅकर्सने बिटकॉइन कायदेशीर करण्यासाठी ट्विट केले