सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने 6 महिन्यांत देशातील लहान मुलांसाठी नोव्हावॅक्स कोविड लस सुरू करण्याची योजना आखली आहे. SII चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की, नोव्हावॅक्स लसीची 3 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांवर चाचणी करण्यात आली आहे.
या चाचणीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये आदर यांनी हे भाष्य केले. आदर पूनावाला म्हणाले की, आम्हाला मुलांमध्ये गंभीर आजार दिसले नाहीत. सुदैवाने, मुलांबाबत घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, आम्ही येत्या सहा महिन्यांत मुलांची लस आणू. आशा आहे की ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असेल. ते म्हणाले की, देशात दोन कंपन्यांना लहान मुलांच्या लसीसाठी परवाना देण्यात आला असून त्यांची लस लवकरच उपलब्ध होईल.