Home Nagpur #Nagpur : नागपुरात नितीन गडकरींच्या स्टेजवर ‘मुन्नाभाई’ संजय दत्त म्हणाला कैसे है...

#Nagpur : नागपुरात नितीन गडकरींच्या स्टेजवर ‘मुन्नाभाई’ संजय दत्त म्हणाला कैसे है मामू..?

607

नागपूर ब्युरो : नागपुरात शुक्रवार पासून सांस्कृतीक महोत्सवाची मेजवाणी सुरू झाली आहे. शुक्रवार ला अभिनेता संजय दत्त याच्या हस्ते ‘खासदार सांस्कृतीक’ महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्य उपस्थिती होती. नागपुरात १७ ते २६ डिसेंबर पर्यंत ‘खासदार सांस्कृतीक’ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील १० दिवस विविध सांस्कृतीक महोत्सवाची मेजवाणी असणार आहे.

या वेळी संजय दत्त याने आपल्या भाषणाची सुरुवातच कैसे है मामू? असा सवाल विचारत केली. त्यामुळे टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट पहायला मिळाला. पुढे संजय दत्त म्हणाला मी विजय दर्डा यांना विचारलं एवढे लांब भाषण तुम्ही कसे देता, आम्ही डोयलॉग लिहून घेत असतो. मला भाषण देता येत नाही तेव्हा मी डायलॉग बोलतो. तुम्ही संजू सिनेमा पहिला असेल तर त्यातल्या दोन चार गोष्टी घ्या आणि आई वडिलांची इज्जत करणे शिका असेही तो म्हणाला. मुन्ना भाई-3 ची मी प्रतीक्षा करत आहे असेही यावेळी संजय दत्तने सांगितले. गडकरींचे कौतुक करताना संजय दत्त म्हणाला, गडकरींसारखा नेता मी अजून बघितला नाही, माझ्या वडीलांनंतर ते गुण मी गडकरींमध्ये बघतो, जो नेता फक्त जनतेचा विचार करतो. अशा शब्दात संजय दत्तने गडकरींचे कौतुक केले आहे.

नितीन गडकरींकडूनही संजय दत्तचं कौतुक

संजय दत्त त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. संजय दत्त यांच्या जीवनात अनेक संकट आली अन्याय झाला. मात्र आता ते संकट टळलं आहे. संजू सिनेमाने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अतिशय मोठा कलाकार आहे संजय दत्त. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचं मोठं योगदान आहे, अशा शब्दात गडकरींनी संजय दत्तचे कौतुक केले. भारतीय चित्रपट सृष्टीने देशाला मोठे संदेश दिले , हे समाज प्रबोधनाचे साधन आहे. अमिताभ बच्चन यांना मी भेटलो तेव्हा त्यांना आनंद सिनेमा बद्दल सांगितलं तो मी अनेकदा पहिला आहे, असे गडकरी म्हणाले. संजय दत्त यांना कॅन्सर झाला होता मात्र आता त्यांनी सांगितलं आता ते पूर्ण त्यातून मुक्त झाले. लोकांचा इतका प्रतिसाद आहे की आम्हाला डिजिटल प्रवेशिका देणं बंद करावे लागले, असेही गडकरींनी यावेळी सांगितले. विदर्भातील कलाकारांना यात आम्ही बोलावलं, त्यांना संधी दिली जात आहे. या आयोजनात माझे फोटो जास्त लावले ते मला आवडलं नाही, एक दोन फोटो ठीक आहे. अशा शब्दात गडकरींनी कानही उपटले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
प्रसिद्ध पार्श्‍वगायक सुखविंदर सिंग यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट ‘चक दे इंडिया’

मान्‍यवरांच्‍या उपस्‍थ‍ितीत शुक्रवारी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद् घाटन झाल्‍यानंतर लगेच ‘चक दे इंडिया’ या थीमवर फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ झाले.

‘स्‍लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या त्‍यांच्‍या चित्रपटाला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर नावाजले गेले असून अॅकॅडमी आणि ग्रॅमी पुरस्‍कारही प्राप्‍त केले आहेत. याच जय हो ने त्यांनी माहोल केला. ‘दिल से’ चित्रपटातील ‘छय्या छय्या’, ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील ‘चक दे इंडिया’ या त्‍यांच्‍या गीतांनीही यावेळी प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. सुखविंदर सिंह यांनी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा केला.

घरबसल्‍या मिळवा पासेस

नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत. त्‍याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा असून एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्‍लीक केल्‍यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करता येईल.

कोविड नियमांचे होणार काटेकोर पालन-

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर सरकारने त्‍यासंदर्भात घालून दिलेल्‍या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची त्‍यासाठी मदत घेतली जात असून आयोजनस्‍थळी दररोज ८ ते १० हजार N- 95 मास्‍क वितरीत केले जाणार आहे. दोन खुर्च्‍यांमध्‍ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून पटांगणाच्‍या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था राहणार आहे

पार्किंग व्यवस्था अशी राहील-
  • टू व्हीलर पार्किंग – संताजी सभागृह, संत रविदास सभागृह, ओसीडब्लू ऑफिस, प्रेरणा कॉलेज
  • फोर व्हीलर पार्किंग – संताजी सभागृह, ओसीडब्लू ऑफिस
  • व्हीआयपी पार्किंग – नागपूर सुधार प्रन्यास
  • शासकीय व पोलीस कर्मचारी वाहन – धन्वंतरी रुग्णालय
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे वेळापत्रक-
  1. शुक्रवार, १७ डिसेंबर : उद् घाटन व सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट – चक दे इंडिया’
  2. शन‍िवार, १८ डिसेंबर : ‘कैलाश खेर अँड कैलासा’ बँड लाईव्‍ह परफॉर्मन्‍स
  3. रव‍िवार, १९ डिसेंबर : ‘कविसंमेलन’ सहभाग – कुमार विश्‍वास, विमल त्‍यागी, शिखा पचौरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी
  4. सोमवार, २० डिसेंबर : काणेबुवा प्रतिष्‍ठानचा ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ कार्यक्रम
  5. मंगळवार, २१ डिसेंबर : ‘नॉर्थ – साऊथ’ जुगलबंदी
  6. बुधवार, २२ डिसेंबर : निराली प्रॉडक्‍शनचे ‘आम्रपाली’ महानाट्य
  7. गुरुवार, २३ डिसेंबर : ‘संस्‍कृतिका उत्‍सव’ डॉ. सय्यद पाशा आणि चमूचा ‘डान्‍स ऑन व्हिल्‍स’
  8. शुक्रवार, २४ डिसेंबर : ‘महाराष्‍ट्राची हास्‍य जत्रा’
  9. शन‍िवार, २५ डिसेंबर : शंकर महादेवन यांचा ‘माय इंडिया… माय म्‍युझिक’ कार्यक्रम
  10. रव‍िवार, २६ डिसेंबर : ‘राधारासबिहारी’ हेमामालिनी यांची नृत्‍यनाटिका