Home Omicron देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 200 पार; महाराष्ट्र -दिल्लीत सर्वाधिक संक्रमित रुग्ण

देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 200 पार; महाराष्ट्र -दिल्लीत सर्वाधिक संक्रमित रुग्ण

537
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 202 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. दोन्ही राज्यात ओमायक्रॉनची 54-54 प्रकरणे आढळून आली आहेत. आज ओडिशामध्ये 2 नवीन संक्रमित आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 5,356 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ओमायक्रॉनचे 77 रुग्ण बरे झाले आहेत.

गुजरातमध्ये ओमायक्रॉनची दहशत, 8 जिल्ह्यांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत रात्रीचा कर्फ्यू वाढवला
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे गुजरात सरकारने राज्यातील 8 प्रमुख शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू 31 डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. कर्फ्यूची वेळ सकाळी 1 ते पहाटे 5 पर्यंत असेल. यामध्ये अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, राजकोट, वडोदरा, भावनगर, जामनगर आणि जुनागढचा समावेश आहे.

आदेशानुसार, रेस्तरॉँ त्यांच्या बसण्याच्या क्षमतेच्या फक्त 75% वापरु शकतात. त्याचबरोबर लग्नसमारंभात ४०० लोकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रविवारी राजकोट जिल्ह्यात राज्यातील पहिला ओमायक्रॉन संक्रमित आढळला. सध्या गुजरातमध्ये 11 ओमायक्रॉन संक्रमित आढळले आहेत.