Home Health Omicron । धोक्याची घंटा! ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र; वॉर रूम...

Omicron । धोक्याची घंटा! ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र; वॉर रूम सक्रिय करण्याची सूचना

526

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांना चेतावनी दिली आहे. केंद्राने म्हटले आहे की, ओमायक्रॉन हा जुन्या डेल्टा व्हेरिएंट पेक्षाही तीन पटीने वेगाने फसरत आहे. त्यामुळे याला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

आज केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवले असून, त्यात असे म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वॉर रूम सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टा हे दोन्ही विषाणू सध्या देशात तळ ठोकून आहेत. त्यामुळे स्थानिक व जिल्हा स्तरावर अधिक दूरदृष्टी दाखवून तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

केंद्र आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यावर देशातील कोरोना आणि ओमायक्रॉन परिस्थितीवर माहिती देण्यात आली आहे. तर काही राज्यात अद्याप ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे त्याला रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना कराव्यात याविषयी माहिती देण्यात आली आहे. जर गरज पडण्यास रात्रीचा कर्फ्यू लावण्याची गर्दी न होण्यासाठी कडम नियम लागू करावे. अशी सूचना देण्यात आली आहे.

केंद्राने पाठवलेल्या आजच्या पत्रात 100% लसीकरण करण्यावर भर द्या. अशी सूचना दिली आहे. तसेच डोर-टू-डोर ओमायक्रॉन तपासण्या कराव्यात. अशा सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉनचा आकडा हा 202 एवढा झाला आहे. त्यातील सर्वात जास्त रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहे. या दोन्ही राज्यात प्रत्येकी 54-54 ओमायक्रॉन रुग्ण आहे. ओडिसात देखील ओमायक्रॉनने शिरकाव केला असून, आज दोन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.