Home मराठी भ्रातृ मंडळाने उभारला समाजभूषण स्व. वि. मा. नारखेडे यांचा अर्धाकृती पुतळा

भ्रातृ मंडळाने उभारला समाजभूषण स्व. वि. मा. नारखेडे यांचा अर्धाकृती पुतळा

476

नागपूर ब्युरो : भ्रातृ मंडळ, नागपूरचे संस्थापक आणि समाजभूषण स्व. वि. मा. नारखेडे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण अलीकडेच येथे पार पडले.

पुतळ्याचे लोकार्पण माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी.एन. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते व ए.एस.आर.बी. नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी उपस्थित होते.

त्यांच्या स्मृतीबद्दल आणि त्यांनी केलेल्या सामजिक कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने भ्रातृ मंडळ, नागपूर कार्यकारीणीने मंडळाच्या प्रांगणात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा ठराव एकमताने पारित केला होता. त्याच ठरावाच्या अनुषंगाने हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भ्रातृ मंडळ, नागपूरचे कार्यवाह उद्धव नारखेडे यांनी केले तर मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. बी.एन. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करवून दिला. मान्यवरांचे भाषण व अध्यक्षीय भाषणानंतर समाजबांधव तसेच पुतळ्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कौटूंबिक आभार डॉ. प्रणिता नारखेडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. अनिल नारखेडे यांनी केले तर आभार श्रीकृष्ण भारंबे यांनी मानले.