मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीच्या मणक्यासंदर्भात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रत्यक्षपणे कुठल्याही कार्यक्रमात किंवा कामकाजात सहभागी होत नाहीत. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांवर पाठीच्या मणक्यासंदर्भात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ते सध्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाही. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांकडून जोरदार टीका केली होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते येत नाहीत म्हणून आक्षेप घेणे बरोबर नाही. तब्येत खराब असेल त्यामुळे ते आले नाहीत तरीही आम्ही अधिवेशन पार पाडू. आमचे म्हणणे आहे की कामकाज व्हावे. आमचे सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचे वाटप करावे, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत अजूनही ठीक नसल्याने ते अधिवेशनादरम्यान सभागृहात किती काळ उपस्थित राहणार याबाबतही प्रश्न आहे. यावरुनच चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुसऱ्याकडे चार्ज द्यायला हवा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावे. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायला हवी असे देखील पाटील म्हणाले.