Home मराठी कृषी महाविद्यालये, स्विमिंग पूल, कोचिंग क्लासेला परवानगी, मनपा आयुक्तांचे आदेश जारी

कृषी महाविद्यालये, स्विमिंग पूल, कोचिंग क्लासेला परवानगी, मनपा आयुक्तांचे आदेश जारी

576

नागपूर ब्युरो : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षापासून शहरातील बंद असलेली कृषी महाविद्यालये, स्विमिंग पूल व कोचिंग क्लासेस सुरू करण्याला महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परवानगी दिली आहे. गुरुवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

कोरोना संक्रमणामुळे नागपूरसह राज्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले होते. संक्रमणाचा धोका कमी होताच व्यवहार सुरू करण्याला टप्प्याटप्प्याने परवानगी देण्यात आली. मनपा आयुक्तांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर कृषी महाविद्यालये, स्विमिंग पूल व कोचिंग क्लासेस सुरू करण्याला परवानगी दिली आहे.