Home Social Media व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच मिळणार हार्ट इमोजी फिचर्स, चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच मिळणार हार्ट इमोजी फिचर्स, चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’

491

सोशल मीडिया अ‍ॅप्स व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच अ‍ॅनिमेटेड इमोजी मिळणार आहेत. त्यासाठी कंपनीने एक नवीन फिचर्स तयार केले असून, सध्या त्यांची टेस्टिंग सुरू आहे. यावर्षी कंपनीला एका नव्या पॉलिसीमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. आपला तोटा भरण्यासाठी कंपनीने यावर्षी अनेक फिचर्स व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिले आहेत.

नववर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले असताना, या वर्षाचा निरोप घेत कंपनी ग्राहकांसाठी अ‍ॅनिमेटेड इमोजीचे अनोखे गिफ्ट देणार आहे. अ‍ॅड्रॉइड आणि आयएसओ या दोन्ही सिस्टमच्या ग्राहकांना लवकरच अ‍ॅनिमेटेड इमोजीचा आनंद घेता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी हा फिचर्स यापुर्वीच प्रदान करण्यात आला आहे.

कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सध्या कंपनी आणि डेव्हलपर्स हार्ट इमोजीवर काम करत आहेत. सध्याच्या घडीला फक्त लाल रंगाचा हार्ट इमोजी पाहायला मिळतो. मात्र या नव्या अपडेटनंतर वेगवेगळ्या रंगाचे हार्ट इमोजीचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे.

यापुर्वी अनेक फिचर्स केले लॉन्च

मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट : नुकतेच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मल्टी-डिव्हाइस फिचर्स लॉन्च केले आहे. त्यामुळे एका व्हॉट्सअ‍ॅपला चार ठिकाणी वापरणे सोयीस्कर झाले आहे. या फिचर्सला आपण कॉम्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये देखील वापरू शकता.

ग्रुप कॉल्स फिचर्स : या फिचरद्वारे युजर्स मिस्ड ग्रुप कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. याच्या फिचर्सच्या मदतीने, सहभागी जोडण्यासाठी संपूर्ण ग्रुप कॉल रीस्टार्ट करण्याची गरज नाही. ज्यांना आधीच सुरू असलेल्या कॉलमध्ये सामील व्हायचे आहे, ते कॉलमध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप कॉल लॉग’वर जाऊ शकतात. यासाठी, तुम्हाला कॉल डिटेल स्क्रीन ओपन करावी लागेल आणि नंतर सामील होण्यासाठी ‘जॉइन’ वर टॅप करावे लागेल.