Home मराठी एके 47 असो की बॉम्ब, रासायनिक हल्ले सुद्धा ठरतील फेल; अशी आहे...

एके 47 असो की बॉम्ब, रासायनिक हल्ले सुद्धा ठरतील फेल; अशी आहे पीएम मोदींची 12 कोटी रुपयांची नवीन कार

458
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आता आणखी एका मर्सिडीज कारची भर पडली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर ही नवीन कार खरेदी करण्यात आली आहे. मर्सिडीज कंपनीची ही कार असून, तिचा मॉडेल नंबर मर्सिडीज-मेबॅक S650 गार्ड आहे.

    ही कार अनेक उत्तमोत्तम आणि हायटेक फीचर्सने सुसज्ज आहे, विशेष म्हणजे या कारमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती गोळ्या आणि बॉम्बस्फोटांमुळे प्रभावित होत नाही. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन भारतात जेव्हा आले होते. त्यादरम्यान मोदींना या कारमध्ये पहिल्यांदा पाहिल्या गेले होते. मोदींच्या या नव्या कारमध्ये काय-काय आहे खास जाणून घेऊया..

  • या कारमध्ये हायलेवल सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. कारच्या दरवाज्याच्या काचाला देखील विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामधुन AK-47 बंदुकीची गोळी देखील आरपार जाऊ शकत नाही.
  • या कारला एक्सप्लोसिव रेसिस्टेंट व्हिकल 2010 इतकी रेटिंग मिळाली आहे. अवघ्या दोन मीटर लांबीवर देखील स्फोट झाला तरीही कारमधील व्यक्ती सुरक्षित असतो.
  • कारच्या खिडक्या पॉली कार्बोनेटसह लेपित आहेत. हे सुरक्षिततेचा आणखी एक स्तर प्रदान करते. गॅस अटॅक झाल्यास केबिनला स्वतंत्र हवा पुरवठा देखील मिळतो.
  • मर्सिडीज-मेबॅक S650 गार्ड मध्ये विशेष रन-फ्लॅट टायर देण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्याने टायरवर निशाणा देखील साधला तरीही टायरला कोणतीही इजा न होता, ते व्यवस्थित वेग धरणार शकतील.
  • कारच्या इंधन टाकीवर एक विशेष एलिमेंट कोट देण्यात आला आहे. जर कोणी इंधन टाकीवर गोळीबार जरी केला तर एलिमेंट कोट हा त्याला तात्काळ नष्ट करतो. एलिमेंट कोट हा AH-64 अपाचे टॅंक अटॅक हेलिकॉप्टरमध्ये वापरण्यात येतो. त्याच्या सामग्रीने हा एलिमेंट कोट कारसाठी तयार करण्यात आला आहे.

    मर्सिडीज-मेबॅक S650 गार्डचे इंजिन आणि इंटीरियर

    इंजिन : या हायलेवल सुरक्षा प्रदान करणाऱ्या कारमध्ये 6.0 लीटर ट्विन-टर्बो V12 चा इंजिन देण्यात आला आहे. त्यामुळे 516bhp पावर आणि 900nm चे टॉर्क तयार करण्यास मदत मिळते. कारची सर्वात टॉप स्पीड ही 160 किमी प्रति तास इतकी आहे.

    इंटीरियर : कारमध्ये केवळ दोन सीटच आहे. जे प्रवासादरम्यान थकवा आल्यानंतर आरामदायी प्रवास देखील करू शकते. प्रवाशांच्या हिशोबाने त्यात लेगरुम तयार केले जाऊ शकते. कारच्या मागील सीटाच्या जागी देखील चेंजेस करण्यात आले आहे.

    मर्सिडीज-मेबॅक S650 गार्डची किंमत
    मर्सिडीज-मेबॅक S650 गार्डची किंमत सुमारे 12 कोटींच्या आसपास आहे. जेकी इतर सुरक्षा कारच्या तुलनेत खुप जास्त आहे. गेल्या वर्षी आलेल्या मर्सिडीज-मेबॅक S600 ची किंमत 10.5 कोटी इतकी आहे.

    एसपीजी गाड्यांचे अपग्रेडेशन ठरवते
    नवीन कारचे अपग्रेडेशन सामान्यतः स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) द्वारे केले जाते. जे देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेची काळजी घेते. एसपीजी सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन राज्याच्या प्रमुखाला वाहन अपग्रेड आवश्यक आहे की नाही हे ठरवते. अशा परिस्थितीत आता पीएम मोदींच्या ताफ्यातील वाहने अपग्रेड करण्यात आली आहेत. मर्सिडीज-मेबॅक S650 गार्ड रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरवरुन अपग्रेड केले गेले आहे.

    पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरात मुख्यमंत्री होते तेव्हा ते बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पियोने प्रकार करायचे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी BMW च्या 7 हाय-सिक्योरिटी गाड्या घेतल्या होत्या. त्यानंतर वेळेनुसार त्यांनी आपल्या गाड्या बदलल्याचे पाहायला मिळते.