Home Covid-19 जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला इशारा

जगभरात ओमायक्रॉनचा कहर, बाधितांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ; WHO ने दिला इशारा

497

देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंतेच आणखीणच भर पडत आहे. मागील एका आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनबाबत इशारा दिला आहे. WHO ने धोका कायम असल्याचे सांगितले आहे.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या देशात डेल्टापेक्षा ओमायक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे. त्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक माहिती म्हटले की, नव्या ओमायक्रॉनबाबतचा धोका अजूनही अधिकच आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक फैलावत असून अवघ्या दोन ते तीन दिवसात ही रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. या वेगामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. समोर आलेल्या डाटानुसार, ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटहूनही अत्यंत वेगाने पसरत असल्याचे आणि केवळ दोन ते तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. डेल्टालाही मागे टाकणाऱ्या देशांत ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अपडेटमध्ये म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोना बाधितांच्या संख्येत 29 टक्क्यांनी घट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉन व्हेरियंट आढळला होता. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधील आकडेवारीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे.

चीनमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 200 रुग्ण आढळले आहेत. मागील 20 महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचे बोलले जात आहे. शांक्सी प्रांताची राजधानी शीआनमध्ये गेल्या 24 तासात 150 रुग्णांची नोंद करण्यात आली.