Home मराठी नागपुरात बोलेरो-पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, चार महिला मजुरांचा मृत्यू

नागपुरात बोलेरो-पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, चार महिला मजुरांचा मृत्यू

514

नागपूर ब्युरो : नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात बोलेरो-पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाला. इतर पाच महिला मजूर गंभीर जखमी झाले.

आज पहाटे काटोल तालुक्यातील ईसापूर-घुबडमेट रस्त्यावर अपघात झाला. मिळालेल्या माहिती नुसार परिसरातील संत्राच्या बागेत संत्रा तोडण्यासाठी या महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या. पहाटे चारच्या सुमारास बोलेरो वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली.

त्याच्यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला मजुराचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.