Home Business राकेश झुनझुनवालांचा नवा 14 मजली महाल, मलबार हिल येथे 371 कोटींना विकत...

राकेश झुनझुनवालांचा नवा 14 मजली महाल, मलबार हिल येथे 371 कोटींना विकत घेतली जागा

571

देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आता 14 मजली आलिशान घरात राहणार आहेत. मुंबईत असलेल्या मलबार हिलमध्ये त्यांचे मोठो घर बांधले जात आहे.अनेक उद्योगपती जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात. घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. लवकरच ते आलीशान घरात शिफ्ट होणार आहे.

देशातील 36 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

राकेश झुनझुनवाला 5.7 अब्ज डॉलरच्या संपत्ती असलेले देशातील 36 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. झुनझुनवाला सध्या आपल्या कुटुंबासह एका अपार्टमेंटमध्ये दोन मजली घरात राहतात. मलबार हिलमध्येच सज्जन जिंदल, आदि गोदरेज, बिर्ला कुटुंबियदेखील राहतात. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर आहे.

371 कोटींना विकत घेतली जागा

ज्या जागी देशातील या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या आलिशान घराचे काम सुरू आहे तिथे आधी 14 फ्लॅट्स होते. झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ही जागा 371 कोटींना विकत घेतली होती. इथे असणारे फ्लॅट्स पाडून आता तिथे नवा बंगला बांधला जातो आहे. एकूण 2700 चौ. फूटांच्या प्लॉटवर 57 मीटर उंच इमारत बांधली जाते आहे.

नव्या घरात आणखी काय ?

चौथ्या मजल्यावर पाहुण्यांच्या स्वागताची व्यवस्था असणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मध्यम आकाराचे काही रुम, बाथरुम आणि स्टोरेज एरिया असणार आहे. तळमजल्यावर तीन पट उंच असणारी लॉबी, एक फॉये आणि एक फुटबॉल कोर्ट बनवले जाणार आहे. इथे सात पार्किंग स्लॉट बनणार आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत.