Home कोरोना लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडीच्या आयसीयू मध्ये करण्यात आले दाखल

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडीच्या आयसीयू मध्ये करण्यात आले दाखल

693

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अलीकडे अनेक बॉलीवूड सेलेब्सही याच्या कचाट्यात सापडले आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचाही समावेश झाला आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचे वृत्त आहे.



कोविडमुळे लता मंगेशकर यांना निमोनिया झाल्याची माहिती समोर आली आहे. याला कोविड निमोनिया असेही म्हटले जाते. लता मंगेशकर शनिवारी रात्रीपासून ब्रिच कँडी रुग्णालयात आहेत. कोरोनामुळे त्यांची तब्येत नाजूक असल्याचे वृत्त आहे.