Home मराठी एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या ट्रॉलीला आग; विमानातील सर्व 85 प्रवासी सुखरूप

एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या ट्रॉलीला आग; विमानातील सर्व 85 प्रवासी सुखरूप

612

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारी एक मोठा अनर्थ टळला आहे. एअर इंडियाच्या विमानाला टोइंग करणाऱ्या वाहनाला आग लागली. विमानापासून काही मीटर अंतरावर ही घटना घटली आहे.. समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसत आहेत. आग लागली तेव्हा विमानात 85 लोक प्रवासी होते.

सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईहून जामनगरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI-647 जवळ ही आग लागली. ट्रॉलीला सुमारे 10 मिनिटे आग लागली आणि यावेळी उड्डाण रोखण्यात आले. विमानतळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत ‘टो-वाहन’चे मोठे नुकसान झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “टो-बार A320 विमानाला जोडले जात असताना अचानक आग लागली. इंधन भरल्यानंतरच पुशबॅक टग परत आला. जळत्या वाहनापासून काही फूट दूर उभ्या असलेल्या विमानाला कोणतेही नुकसान झाले नाही. जामनगर उड्डाण आगीमुळे सुमारे 20 मिनिटे उशीर झाला. या संदर्भात विमान कंपनी आणि विमानतळाकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.