Home कोरोना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 31 लाख रुग्ण, 6912 मृत्यू

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 31 लाख रुग्ण, 6912 मृत्यू

535

देशात २७ डिसेंबरपासून सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट उच्च स्तरावर आहे. आतापर्यंत ३१ लाख नवे रुग्ण आढळले असून यापैकी ६,९१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्युदर फक्त ०.२ टक्के आहे. म्हणजे, १ हजार रुग्णांत फक्त २ रुग्ण दगावताहेत. हा दर जगात सर्वात कमी आहे. तज्ज्ञांनुसार, हा फार मोठा दिलासा आहे. कारण, कोरोनाच्या पहिल्या लाटेत आढळलेल्या पहिल्या ३१ लाख रुग्णांत ५७,९२१ जणांचा मृत्यू झाला होता.

पहिल्या लाटेत १.२२ कोटी रुग्ण नोंदवले गेले. त्यानंतर दुसऱ्या लाटेत २.३४ कोटी रुग्ण आढळले. यातील सुरुवातीच्या ३१ लाख रुग्णांत २१,२४४ जणांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी राज्य सरकारांची होती. त्यावर सध्या अभ्यास सुरू आहे. म्हणजे, मृतांची संख्या २१,२४४ हून कितीतरी अधिक होता. विविध संशोधनांनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा आठ पटीने कमी घातक आहे. त्यामुळे अनेक देशांत रुग्ण प्रचंड वाढत असतानाही निर्बंध लावलेले नाहीत. स्पेनने तर याला साधारण फ्लू घोषित केले आहे.
आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पांडांनुसार, ११ मार्चपर्यंत देशात नवे रुग्ण आढळणे बंद होईल आयसीएमआरमध्ये महामारीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा म्हणाले, जर नवा व्हेरिएंट आला नाही तर ११ मार्चपर्यंत कोरोना एंडेमिक टप्प्यात जाईल. डॉ. पांडांनुसार, गणितीय मॉडेल सांगते की, ओमायक्रॉन तीन महिनेच टिकू शकेल आणि ११ मार्चनंतर देशात कोरोनाचे नवे रुग्ण आढळणे जवळपास बंद होईल.



ज्येष्ठ अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. फाउची यांच्यानुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट हा महामारीचा शेवटच अमेरिकी अध्यक्षांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाउची म्हणाले, “ओमायक्रॉन हाच या महामारीला एंडेमिक टप्प्यात नेईल. अर्थात, असे म्हणणे थोडे घाईचे ठरते, परंतु ओमायक्रॉनच या महामारीचा अंत करेल, याचा मला विश्वास वाटतो.’ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस कार्यक्रमात त्यांनी अजेंडा मांडताना हा दावा केला.

  1. पहिली लाट मृत्युदर 1.9%

  2. दुसरी लाट मृत्युदर 0.7%

  3. तिसरी लाट मृत्युदर 0.2%