Home School राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करा; शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करा; शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

523
राज्यातील शाळा सोमवारपासून शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्या, असा उल्लेख प्रस्तावात आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणे, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.