Home Health केंद्राचे नियम । पाच वर्षांखालील मुलांवर मास्कची सक्ती नाही; 12 वर्षांवरील मुलांनी...

केंद्राचे नियम । पाच वर्षांखालील मुलांवर मास्कची सक्ती नाही; 12 वर्षांवरील मुलांनी तो वापरावाच

522
केंद्र सरकारने गुरुवारी लहान मुले आणि १८ वर्षांच्या आतील किशोरांसाठी कोरोना औषधे व मास्कच्या वापरासाठी सुधारित नियम जारी केले आहेत. त्यानुसार, पाच वर्षे व त्यापेक्षा लहान मुलांसाठी मास्क वापरण्याची शिफारस केलेली नाही.

६ ते ११ वर्षे वयोगटातील मुले मास्क वापरू शकतात. मात्र ते त्यांच्या मास्क वापरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. १२ वा त्यापेक्षा जास्त वयाच्या किशोरांनी प्रौढांप्रमाणेच मास्क वापरला पाहिजे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणांच्या प्रकरणात स्टेरॉइडचा वापर हानिकारक आहे. संसर्ग गंभीर असला तरी १८ वर्षांखालील किशोरांसाठी अँटिव्हायरल वा मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या वापराची शिफारस नाही.

देशात गुरुवारी ३ लाख ४४,५३० नवे रुग्ण, तर ६८८ मृत्यू झाले नोंदवले गेले आहेत. देशात ही तिसऱ्या लाटेतील सर्वाेच्च रुग्णवाढ आहे. यापूर्वी २३ एप्रिल म्हणजे, २७२ दिवसांपूर्वी ३ लाख ४५,२९६ नवे रुग्ण आढळले होते.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. वाढत्या लसीकरणामुळे मृत्यू कमी होत आहेत.