Home मराठी भाजप आमदार विजय रहांगडालेंच्या मुलासह सात विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

भाजप आमदार विजय रहांगडालेंच्या मुलासह सात विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

530

वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला जात असताना रात्री एकच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

अचानक चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरुन खाली कोसळली. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.

चालकाचे बोलेरो गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघातात दत्ता मेघे वैद्यकीय रूग्णालयातील सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
  1. आविष्कार रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा
  2. नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
  3. नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस
  4. विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1
  5. प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
  6. शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
  7. पवन शक्ती, 2020, एमबीबीएस फायनल पार्ट 1