Home Award प्रजासत्ताक दिनानिमित्त 939 जवानांच्या धैर्याला देश करणार सलाम; महाराष्ट्र पोलिसांना 7 शौर्य...

प्रजासत्ताक दिनानिमित्त 939 जवानांच्या धैर्याला देश करणार सलाम; महाराष्ट्र पोलिसांना 7 शौर्य पदके

625

प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पुरस्कार मिळवण्याऱ्या विजेत्यांच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी 939 पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसाबद्दल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामधील 189 गौरवमूर्तींना पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. तर 88 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि 662 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक देण्यात येणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेत अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने गौरविले जाते.

पोलिस पदक प्राप्त 189 शौर्यवीरांपैकी 134 जवानांना जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील त्यांच्या शौर्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. पोलिस पदकासाठी छत्तीसडमधील त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी 10 जण, दिल्लीतील 3, झारखंडमधील 2, मध्य प्रदेशचे 3 मणिपूर, उत्तर प्रदेशमधील 1 आणि ओरिसामधील धैर्यासाठी 9 जणांना पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारामध्ये केंद्रीय राखीव दलातील 30 पोलिसांचा समावेश आहे, तर शस्त्रात सीमा दलातील 3 जवानांना पोलिस पदक प्रदान केले जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात तुरुंग अधिकाऱ्यांनाही पुरस्कार दिला जाणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांना सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 26 जानेवारीच्या राजपथावरील संचलनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय समर स्मारकामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना अभिवादन करुन मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर तिबेट सीमा दलातील पुरुषांची तुकडी आणि महिलांची तुकडी दुचाकीच्या कवायती दाखवणार आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वाधिक शौर्य पदके – 115 जम्मू आणि काश्मीर पोलिसांना, त्यानंतर 30 केंद्रीय राखीव पोलिस दलाला देण्यात आली आहेत. याशिवाय छत्तीसगड पोलिसांना 10, ओडिशा पोलिसांना 9, महाराष्ट्र पोलिसांना 7, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस आणि सशस्त्र सीमा बल यांना प्रत्येकी तीन पदके देण्यात आली आहेत. इतरांसह सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) दोन पदके प्रदान करण्यात आली आहेत. याशिवाय 88 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक, तर 662 कर्मचाऱ्यांना गुणवंत सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.