Home कोरोना 24 तासात 2.86 लाख नवीन रुग्ण, 573 लोकांचा मृत्यू; पॉझिटिव्हिटी रेट 16%...

24 तासात 2.86 लाख नवीन रुग्ण, 573 लोकांचा मृत्यू; पॉझिटिव्हिटी रेट 16% वरुन 19.5% वर पोहोचला

561

बुधवारी देशात 2 लाख 86 हजार 384 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. या दरम्यान 3.06 लाख लोक बरे झाले, तर 573 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कालच्या तुलनेत 470 अधिक संक्रमित आढळले आहेत.

सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 22.02 लाख आहे. महामारीच्या सुरुवातीपासून देशात सुमारे 4.03 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे.

दरम्यान, बुधवारी पॉझिटिव्हिटी रेट 19.5% नोंदवला गेला. मंगळवारी पॉझिटिव्हिटी दर 16% होता. दररोज नवीन प्रकरणांमध्ये केवळ 0.1% वाढ असूनही, पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुमारे 20% वाढ ही चिंतेची बाब आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 35,756 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 79 जणांचा मृत्यू झाला असून 39,857 रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी 33,914 नवीन रुग्ण आढळले आणि 86 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2.98 लाख झाली आहे. आतापर्यंत एकूण 76.05 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 71.60 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.42 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 19.54% आहे.

  • देशातील कोरोनावर एक नजर
  • एकूण कोरोना केस: 4,03,71,317
  • एकूण रिकव्हरी: 3,76,65,980
  • एकूण मृत्यू: 4,91,701