Home Finance क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सने 600 कोटींची करन्सी केली लंपास, हे 2022 चे सर्वात...

क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सने 600 कोटींची करन्सी केली लंपास, हे 2022 चे सर्वात मोठे हॅकिंग

498

हॅकर्सने डिसेंट्रलाइज्ड फायनान्स (डिफाय) प्लॅटफॉर्म क्युबिट फायनान्सवरून ८ कोटी डॉलर (सुमारे ६०० कोटी रुपये) मूल्याची क्रिप्टोकरन्सी चोरली आहे. ही कंपनी आता चोरी केलेली क्रिप्टोकरन्सी परत करण्याची विनंती हॅकर्सला करत आहे. चोरी केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीच्या हिशेबाने हे २०२२ चे आतापर्यंतचे सर्वात मोठे हॅकिंग आहे. क्युबिट फायनान्सने या हॅकिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, हॅकर्सने बायनान्स स्मार्ट चेनवर (बीएससी) उधार घेण्यासाठी असीमित एक्सप्लोसिव्ह अथेरियमचे मायनिंग केले. कंपनीने एका पोस्टमध्ये म्हटले, ‘आमची टीम भविष्यात उचलल्या जाणाऱ्या पावलांसाठी सेक्युरिटी आणि नेटवर्क पार्टनर्ससोबत मिळून काम करत आहे. क्युबिट फायनान्सच्या टीमने थेट हॅकर्सशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे.

क्युबिट युजर्सचे नुकसान कमी करता यावे हा त्यामागील हेतू आहे. त्याचबरोबर कंपनीने हॅकर्सना रक्कम परत करण्याच्या बदल्यात जास्तीत जास्त बग बाउंटी देण्याचा प्रस्तावही दिला आहे. बग बाउंटी एक मौद्रिक रिवॉर्ड आहे, तो एथिकल हॅकर्सना अॅप्लिकेशन/सिस्टिम्समध्ये सेक्युरिटीशी संबंधित जोखीम किंवा कमजोरी शोधणे आणि रिपोर्ट करण्यासाठी दिला जातो. बग बाउंटी प्रोग्राम कंपन्यांना काळानुसार सतत आपल्या सिस्टिमच्या सुरक्षा स्थितीत सुधारणा करण्यासाठी हॅकर कम्युनिटीचा फायदा घेण्याची परवानगी देते.

क्युबिट विविध ब्लॉकचेन्सदरम्यान ब्रिज सर्व्हिस देते. म्हणजे एका क्रिप्टोकरन्सीत रक्कम डिपॉझिट केल्यास तर दुसऱ्या क्रिप्टोकरन्सीत ती काढून घेता येते. क्रिप्टो ब्रीफिंगनुसार २०२० मध्ये बायनान्स स्मार्ट चेनच्या (बीएससी) लाँचनंतर अनेक डीफाय प्रोजेक्ट्सना हॅकिंगचा सामना करावा लागला आहे. त्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये युरेनियम फायनान्सविरुद्ध ५ कोटी डॉलरचे (३७५ कोटी रुपये) हॅकिंग आणि मेमध्ये व्हीनस फायनान्सविरुद्ध ८.८ कोटी डॉलरच्या (६६० कोटी रुपये) हॅकिंगचा समावेश आहे. डीफाय एक नवीन आर्थिक तंत्रज्ञान आहे जे सुरक्षित डिस्ट्रिब्युटेड ब्लॉकचेन लेजर्सवर आधारित आहे, त्याचा वापर क्रिप्टोकरन्सीत होतो.