गरज भासली तर पुढे हिंदुस्तानी भाई ला ताब्यात घेऊ- पोलीस आयुक्तांची माहिती
नागपूर ब्युरो : 31 जानेवारी रोजी नागपुरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी केलेला आंदोलन आणि त्या दरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आता विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाई ला आरोपी बनवलं आहे.
नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन मध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी त्याच दिवशी रात्री दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये विद्यार्थ्यांना चिथावणी देत रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि हिंसा करणे यासाठी उद्युक्त करण्यामध्ये हिंदुस्तानी भाई चा हात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी विकास फाटक ला विना परवानगी गर्दी करत आंदोलन करणे, कोरोना नियमांचा उल्लंघन करणे, दंगल करणे तसेच सार्वजनिक संपत्ती चे नुकसान करणे या प्रकरणी आरोपी बनवले आहे.
भविष्यात गरज भासली तर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाई ला नागपूर पोलीस ही ताब्यात घेईल अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.