Home Covid-19 24 तासात 1.72 लाख नवीन रुग्ण, सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी,...

24 तासात 1.72 लाख नवीन रुग्ण, सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी, 1,008 मृत्यू

480

देशात बुधवारी 1.72 लाख नवीन रुग्ण समोर आले. या दरम्यान 2.59 लाख लोक बरे झाले, तर 1,005 लोकांचा मृत्यू झाला. याच्या एक दिवसपूर्वी मंगळवारी 1.61 लाख रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत 11,047 अधिक संक्रमित आढळले होते. म्हणजेच नवीन केसमध्ये 6.40% ची वाढ झाली आहे.

काल देशातील पॉझिटिव्हिटी रेट 10.99% नोंदवला गेला होता, एक दिवस आधी मंगळवारी पॉझिटिव्हिटी दर 9.26% होता. सोमवारपासून देशात 2 लाखांहून कमी नवीन रुग्ण आढळत आहेत. 20 जानेवारी रोजी सर्वाधिक 3.47 लाख नवीन रुग्ण आढळले होते. 20 जानेवारीपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे.

सध्या देशात एकूण सक्रिय रुग्णांची म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15.33 लाख आहे. मागील दिवसाच्या तुलनेत सक्रिय प्रकरणांची संख्या सुमारे 89,392 ने कमी झाली आहे. एकूण प्रकरणांनी 4.18 कोटींचा आकडा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी देशात झालेल्या 1,008 मृत्यूंपैकी केरळमध्ये गेल्या काही दिवसांत 335 मृत्यू झाले आहेत. हे आकडे नुकतेच जोडले गेले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 18,067 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 79 लोकांचा मृत्यू झाला असून 36,281 रुग्ण बरे झाले आहेत. याच्या एक दिवस आधी 14,372 नवीन रुग्ण आढळले आणि 94 लोकांचा मृत्यू झाला. आता राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1.73 लाखांवर आली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 77.53 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 74.33 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.42 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 10.67% आहे, आदल्या दिवशी मंगळवारी 9.40% होता.