Home Covid-19 राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर; दिवसभरात 18 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर; दिवसभरात 18 हजार रुग्ण कोरोनामुक्त

518

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. तसेच मृत्यूचा आकडा देखील कमी होत असल्याने राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 436 नव्या कोरोना रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 24 रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आज दिवसभरात 18 हजार 423 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या राज्यातील विविध भागात 1 लाख 06 हजार 59 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 75 लाख 57 हजार 34 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण हा 96.76 टक्के इतका आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 78 लाख 10 हजार 136 जणांना कोरोनाची ग्रासले आहे. राज्यात सध्या 6 लाख 73 हजार 875 रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहे तर 2 हजार 383 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात कोरोना या भयावह विषाणूने आतापर्यंत 1 लाख 43 हजार 98 जणांचा जीव गेला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. ही दिलासादायक बाबच म्हणावी लागेल. नववर्षाच्या सुरुवातीला देशासह राज्यात देखील ओमायक्रॉनने धुमाकूळ घातला होता. मात्र आता कोरोनाचा वेग मंदावला असून, दैनंदिन रुग्णसंख्या ही सहा हजारांवर आली आहे.