Home मराठी नितीन गडकरी । नाशिक-सुरत 176 किमीचा महामार्ग, 5 तासांचे अंतर येणार सव्वा...

नितीन गडकरी । नाशिक-सुरत 176 किमीचा महामार्ग, 5 तासांचे अंतर येणार सव्वा तासावर

634

केंद्र सरकारच्या ग्रीन फील्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग उभारला जाणार आहे. तीन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक ते सुरतदरम्यानचे अंतर अवघे १७६ किमीवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या सव्वा तासात सुरत शहर गाठता येणार असल्याची घाेषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

सुरत ते चेन्नई हे १,६०० किमीचे अंतर १,२५० किमीवर येईल. मुंबई, पुणे, साेलापूर या शहरांच्या वाहतुकीचा बोजा निम्याने घटेल. यंदा मार्चमध्ये निविदा काढून मार्च २०२३ मध्ये काम सुरू हाेऊन पुढील अडीच वर्षांत पूर्ण हाेईल.
नाशिक जिल्ह्यामार्गे दरराेज सुरतकडे सुमारे ४६,००० वाहने जातात. जिल्ह्यात १२२ किलोमीटरच्या या महामार्गासाठी ११,००० काेटी रुपये खर्च येईल.

सध्या नाशिक-धरमपुर-सुरत या मार्गाचे अंतर २२५ किमी आहे. दुसरा २४० किमीचा मार्ग नाशिक-दिंडाेरी-सापुतारा मार्गे सुरत असा आहे. या दाेन्ही मार्गांनी सुरतला पाेहाेचण्यासाठी किमान ५ तास लागतात. त्याची आता बचत होईल.

रस्त्याच्या बाजूला, लाॅजिस्टिक-रिसर्च सेंटर्स, गाेडाऊन्स, उद्याेग, अन्न प्रक्रिया उद्याेग, काेल्डस्टाेअर उभे राहतील. दक्षिणेतही भाजीपाला पाेहाेचवता येईल. सूरतमधील भाविकांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी जाण्यासाठी मोठी साेय होईल.