आयपीएल 2022 मेगा लिलावचा दुसरा दिवस बंगळुरूमध्ये सुरू आहे. 10 बोली लावणाऱ्या फ्रँचायझींनी आतापर्यंत 86 खेळाडूंना खरेदी केले आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन 10 कोटींहून अधिक किमतीत विकला जाणारा पहिला खेळाडू ठरला. त्याला खरेदी करण्यासाठी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा होती.
लिलावाचा दुसरा दिवस अनेक दिग्गज खेळाडूंसाठी चांगला गेला नाही. ऑस्ट्रेलियाला T20 विश्वचषक जिंकून देणारा ऍरॉन फिंच, इंग्लंडचा एकदिवसीय आणि T20 संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन या दोघांनाही खरेदीदार मिळाला नाही. चेतेश्वर पुजारालाही खरेदीदार मिळू शकला नाही.