Home Social अखिल भारतीय धनोजे कुणबी समाजा तर्फे उपवर-वधू परिचय मेळावा संपन्न

अखिल भारतीय धनोजे कुणबी समाजा तर्फे उपवर-वधू परिचय मेळावा संपन्न

584

शुभमंगल समरणिकेचे प्रकाशन

नागपूर ब्यूरो : अखिल भारतीय धनोजे कुणबी समाज व राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर-वधू युवक-युवती परिचय आणि स्मरणिकेचे प्रकाशन समाजभवन, ८१, सुयोग नगर येथे संपन्न झाला. या ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून मा. सौ. सुमित्राताई मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष जि.प.नागपूर, अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन चिंतामणराव कोंगरे, विशेष अतिथी श्री सतिण नागोराव मोवाडे, मार्गदर्शक प्रा.डॉ.गंगाधरराव बोबडे उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री रामभाऊ मुसळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय धनोजे कुणबी समाजा चे अध्यक्ष डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाचे विधिवत उद्‌घाटन सौ. सुमित्राताई कुंभारे यांनी केले व समाज बांधवाना शुभकामना दिल्या. आपल्या मनोगतात विशेष अतिथी श्री सतिशजी मोवाडे म्हणाले की हे काळाच्या बरोबरीने आपण विचारांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री गंगाधरराव बोबडे यांनी आवाहन केले की सर्व बंधु-भगिनींनी एकत्र येऊन संघटितपणे काम करण्याची गरज आहे. आपले नवे मंडळ नवीन उपक्रम चालवतिल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्याचा यु-ट्युबद्वारे जागतिक पातळीवर लाभ घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोंगरे यांनी आजच्या तरूण पिढीने काळाची आव्हाने स्विकारून नव्या क्षेत्रात जाण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन केले .

याप्रसंगी समाजातील कर्तृत्ववान व कर्तबगार व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. वैशाली सोमलकर, डॉ.गायत्री ताजणे, सूत्रसंचलन केले. श्री दिलीप माथनकर, श्याम सुंदर गोहोकर, श्री गणराज मोहितकर, श्री खंगार, श्री दिवाकर मोहितकर, श्री देवराव मांडवकर, आनंद धानोरकर आदिनी कार्यक्रम संपन्न करण्याकर्ता सहकार्य केले. या वर-वधू युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन स्पेक्ट्रम इव्हेंटस्‌ यांनी केले.