Home Business EPFO । रोजगारात 20 टक्क्यांची वाढ, डिसेंबरमध्ये ईपीएफओ शी जोडले गेले 14.60...

EPFO । रोजगारात 20 टक्क्यांची वाढ, डिसेंबरमध्ये ईपीएफओ शी जोडले गेले 14.60 लाख सदस्य

464

देशात पुन्हा एकदा रोजगार वाढू लागला आहे. डिसेंबर 2021 मध्ये, 14.60 लाख नवीन सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सामील झाले. डिसेंबर 2020 च्या तुलनेत हे 16.40% जास्त आहे. डिसेंबर 2020 मध्ये 12.54 लाख सदस्य जोडले गेले. डिसेंबर 2021 मध्ये, नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत 19.98% अधिक लोक EPFO ​​मध्ये सा जोडले गेले. नोव्हेंबरमध्ये 12.17 लाख लोक जोडले गेले होते.

9.11 लाख नवीन सदस्य जोडले गेले : एकूण 14.60 लाख नेट सब्सक्राइबर्समध्ये 9.11 लाख नवीन लोक प्रथमच EPF मध्ये जोडले गेले. तसेच 5.49 लाख असे लोक डिसेंबरमध्ये जोडले गेले आहेत, ज्यांनी कोणत्यातरी कारणाने EPF सोडले होते.

सदस्य जोडण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र हरियाणा पुढे : महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकने या महिन्यात सुमारे 8.97 लाख सब्सक्रायबर्स जोडले. हे एकूण टोटल नेट पेरोलच्या सुमारे 61.44% आहे. तसेच लिंगाविषयी बोलायचे झाले तर महिला ग्राहकांची संख्या 3 लाख आहे.।

22 ते 25 वयोगटातील 3.88 लाख सदस्य EPFO ​​मध्ये सामील : पेरोल डेटानुसार, 22-25 वर्षे वयोगटातील ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. या वयातील ग्राहकांची संख्या 3.87 लाख आहे. यानंतर 18-21 वयोगटातील 2.97 लाख ग्राहक जोडले गेले. यावरून असे दिसून येते की डिसेंबरमध्ये सामील झालेल्या सदस्यांमध्ये 18-25 वयोगटातील भागीदारी 46.89% राहिली.

2020-21 या आर्थिक वर्षात 77.08 लाख नवीन सदस्य जोडले गेले : EPFO मध्ये दर महिन्याला सरासरी 7 लाख नवीन सदस्य जोडले जातात. 2020-21 मध्ये एकूण 77.08 लाख नवीन सदस्य EPFO ​​शी जोडले गेले. EPFO ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात 78.58 लाख नवीन सदस्य EPFO ​​मध्ये सामील झाले. यापूर्वी हा आकडा गेल्या आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 61.12 लाख होता. EPFO एप्रिल 2018 पासून नवीन सदस्यांची आकडेवारी जाहीर करत आहे.