Home कोरोना राज्यात आज कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत, दिवसभरात 806 नव्या रुग्णांची भर; चार...

राज्यात आज कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत, दिवसभरात 806 नव्या रुग्णांची भर; चार जणांचा मृत्यू

557

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, राज्याची कोरोनामूक्तीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 806 रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे राज्यात गेल्या 24 तासात दोन हजार 696 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यात आज 53 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमूक्त झाले आहेत. सध्या राज्यात 515 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

राज्यात आज चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 97 हजार 135 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 97.94 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 1 लाख 76 हजार 378 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 1036 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 72 लाख 89 हजार 104 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 96 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 415 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 96 रुग्णांपैकी 17 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 308 बेड्सपैकी केवळ 807 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.