नागपूर ब्युरो : सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) अंतर्गत महा मेट्रो तर्फे जयस्तंभ वाहतूक सुधार प्रकल्पाचे कार्य वेगाने सुरु असून राम झुला रेल ओव्हर ब्रिज (आरओबी) येथून सुरु होत किंग्सवे वरील श्री मोहिनी चौकापर्यंत असून येथून या पुलाचे दोन भाग होणार आहेत. या पैकी एक भाग – आरबीआय चौकाकडे तर दुसरा भाग एलआयसी चौकाच्या दिशेने असेल जो किंग्स वे जंक्शन येथे वाय आकाराचा असेल. रामझुला पासून सदर पूल सुरु होणार असून या करिता तेथील विद्यमान दोन स्पॅन हटवण्याचे कार्य महा मेट्रो द्वारे आज सुरु करण्यात आले.
हे दोन स्पॅन काढल्या नंतर याच ठिकाणाहून निर्माणाधीन उड्डाणपूल जोडला जाईल. तसेच नागरिकांना त्रास न व्हावा याकरिता रामझुला येथील दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात आली आहे. अपघात टाळण्या करीता महा मेट्रोने रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावले आहेत. या कार्याची अंमलबजावणी महा मेट्रो सार्वजनिक बांधकाम खात्याकरता डिपॉझिट कार्याच्या अंतर्गत करत आहे.
या उड्डाण पुल प्रकल्पाची एकूण लांबी ८५० मिटर असून याचा खर्च ₹ ५० कोटी आहे. राम झुला आणि श्री मोहिनी चौकादरम्यान हा पूल दोन पदरी असेल. दुसरीकडे श्री मोहिनी चौक ते आरबीआय चौक आणि श्री मोहिनी चौक ते एलआयसी चौकादरम्यान हा पूल एक-पदरी असेल तसेच एक पदरी रस्ता रेल्वे स्टेशनच्या दिशेने वळेल उड्डाण पुलाचे निर्माण कार्य जलद गतीने असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्डर तयार करण्यात आला आहे. उड्डाण पुलाचा हा प्रकल्प पूर्ण झाला कि, एकूणच गजबजलेल्या सेंट्रल ऍव्हेन्यू, राम झुला आणि किंग्स वे, श्री मोहिनी मार्गातील आणि परिसरातील वाहनांची होणारी कोंडी दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.