नागपूर ब्यूरो: खांद्याला खांदा लावून निष्ठावान व प्रमाणिकेतेची कर्तव्यदक्ष भूमिका बजावत सर्व बहुजन समाजात मिलणसार व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण केलेले समाजसेवी आदिल विद्रोही हे अवघ्या 48 वर्षाच्या वयात 11 जून 2017 ला अकस्मात देहावसान झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती .आदिल विद्रोही सारखा निष्ठावान विश्वासू कार्यकर्त्यांची आठवण ही सदैव स्मरणात राहणार असून आदिल विद्रोही ची उणिवा अजूनही कायम आहे असे भावनिक मत व्यक्त करीत आदिल विद्रोही यांच्या स्मरणार्थ दरवर्षी भव्य मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर मत माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी काल (3 मार्च)ला आयोजित भव्य ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
समाजसेवी आदिल विद्रोही यांच्या आठवणी स्मरणार्थ विदर्भ एज्युकेशन फोरम च्या वतीने मुस्लिम समाज भवन येथे भव्य ऑल इंडिया मुशायरा आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते आदिल विद्रोही यांच्या जीवनपटावरील स्मरणिका उघडून करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जफर अहमद खान, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, डॉ इशरत जावेद अन्सारी, सादीकुजमा, रियाज सिद्दीकी, आरिफ सर्मत्तीया, आबीद ताजी , विजय पाटील,कलिंम अहमद ,दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, अश्फाक कुरेशी, अफजल अन्सारी, यासह कार्यक्रमांचे आयोजक विदर्भ एज्युकेशन फोरम कामठी चे अध्यक्ष अनावरूल हक पटेल आदी मान्यवरांसह मुशायरा चे प्रसिद्ध शायर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमातऑल इंडिया मुशायरा में सुप्रसिद्ध शायर वाहिद अंसारी (मालेगांव) कमर एजाज (औरंगाबाद) सरिता सरोज (गोंदिया) अहमद हाशिम (नासिक) सलीम नज़मी (विजापुर) सलीम (दरियापुरी) व नागपुर कामठी के सुप्रसिद्ध शायर उपस्थित रहेंगे मंच संचालन खुशबू रामपुरी (उत्तर प्रदेश)यांनी आपले मुशायरे सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते.